बंदुकीतून गोळी सुटल्यामुळे अल्पवयीन मुलगी जखमी तर.. बॉयफ्रेंड केळवा सागरी पोलिसांच्या जाळ्यात अटक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील केळवा बीच रिसॉर्ट मध्ये फिरण्यासाठी आलेल्या तरुणाच्या हातातील बंदुकीची गोळी सुटल्यामुळे एक अल्पवयीन मुलगी जबरी जखमी झाली आहे.ही (17) वर्षीय अल्पवयीन मुलगी बोईसर येथील रहिवासी आहे.
ती शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तिचा बॉयफ्रेंड दिनेश धोडी वय वर्ष (18) राहणार बोईसर याच्या सोबत केळवा बीचवर असलेल्या राऊत रेसिडेन्सी मध्ये फिरण्यासाठी आली होती. दिनेश आपल्या प्रियसीला बंदूक दाखवत असताना अचानकपणे बंदुकीतील गोळी सुटल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. ही गोळी तिच्या मानेवर लागल्यामुळे ती गंभीर जखमी झाली आहे.
तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून सध्या तिच्यावर बोईसर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर दिनेश धोडी याला केळवा सागरी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास केळवा सागरी पोलीस करत आहेत.



