केळवा सागरी पोलीस ठाणे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि सपोर्ट संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सफाळे येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याला युवा तरुणांचा मोठा प्रतिसाद

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय. भ्रमणध्वनी क्रमांक
.7030516640.पालघर जिल्हा वृत्तांत
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान राबवण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर आणि सपोर्ट सामाजिक संस्था व केळवा सागरी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सपोर्ट संस्था माकुणसार रोड आगरवाडी सफाळे येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यामध्ये उपस्थित नामांकित 13 कंपन्यांनी एकूण 1652 पदासाठी या उपस्थित मेळाव्यातील उमेदवारांच्या नोकरीसाठी मुलाखती घेतल्या. यावेळी 154 उमेदवार उपस्थित होते त्यापैकी 67 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तसेच 30 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या मेळाव्यात नौकरी प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांचे केळवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड आणि सर्व कर्मचारी तसेच सपोर्ट संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून अभिनंदन करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या

यावेळी सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, कौशल्य कामगार आयुक्त संध्या साळुंखे,सपोर्ट कार्यकारी संचालक नैनकवाल, उप पोलीस निरीक्षक हरीश धनगर,सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायत उपसरपंच राजेश म्हात्रे, आगरवाडी युवा सरपंच जय पाटील व परिसरातील मान्यवर व्यक्तींसह युवा तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.



