सफाळे विटीलाईन मुजबादेवी मंदिराजवळ अपघात… ठोकर देऊन अज्ञात इसम फरार…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे विटीलाईन या मेन रस्त्यावरील मुजबादेवी मांडे मंदिराजवळ झालेल्या अपघातात विराथन बुद्रुक येथील दोन जण गंभीर रित्या जखमी झाले असून मागून येऊन ठोकर देऊन पळून गेलेल्या अज्ञात इसमाचा सफाळे पोलीस कसून शोध घेत आहेत.
सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास विराथन बुद्रुक वैतीपाडा येथील जयवंत वैती वय वर्ष (45) आणि पांडुरंग पाटील वय वर्ष (55) हे दोघेजण कामावरून आपल्या दुचाकीने घरी येत असताना त्यांची दुचाकी सफाळे येथून मांडे मुजबादेवी मंदिराजवळ आली असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी चालकांनी त्यांना जबरी धडक दिल्यामुळे जयवंत वैती यांच्या पायाला जबरी दुखापत झाली असून पांडुरंग पाटील यांच्या डोळ्याला जबरी इजा झाली आहे. हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून अज्ञात इसम टेंभीखोडावे दिशेने पळून गेल्यावर स्थानिक ग्रामस्थांनी या दोघांना उपचारासाठी माकणे येथील स्वास्तिक या खाजगी रुग्णालयात दाखल केले असून ठोकर देऊन पळून गेलेल्या अज्ञात इसमाचा सफाळे पोलीस कसून शोध घेत आहेत.



