महाराष्ट्र

अकलूज-नातेपुतेत मोहिते-पाटलांना मोठा धक्का; बाबाराजे देशमुखांसह दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

​”आता नातेपुतेतही कमळ फुलणार! मोहिते-पाटील गटातील ‘तुरुपचे एक्के’ आता भाजपच्या गोटात.”

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​नातेपुते : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात, मोहिते-पाटील गटातील दिग्गज नेते आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत (भाजप) अधिकृतपणे प्रवेश केला.

​या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,माजी आमदार रामभाऊ सातपुते,माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

​बाबाराजे देशमुख यांच्यासोबत मोहिते-पाटील गटाचे निष्ठावान मानले जाणारे अनेक दिग्गज नेते राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आता भाजपवासी झाले आहेत, त्यात प्रामुख्याने:फत्तेसिंह माने पाटील (अध्यक्ष, जिल्हा परिषद),सौ. राजलक्ष्मी माने पाटील (माजी सभापती),पांडुरंग भाऊ देशमुख, धनंजय भाऊ देशमुख, संजयकाका देशमुख, धैर्यशीलभाऊ देशमुख, गणपातात्या वाघमोडे (ज्येष्ठ नेते),शशिकांत माने पाटील, वस्ताद ज्ञानदेव लोखंडे,अमरसिंह माने देशमुख, विक्रमभाऊ माने देशमुख, अमृत माने देशमुख,सौ. स्वाती महेश पाटील, मालोजीराजे देशमुख, रणवीर देशमुख,​अर्जुन धाईंजे, महादेव ताठे, उमेश भाकरे, अर्जुन दुधाळ,असे प्रवेश केलेले​ प्रमुख नेते

​गेल्या अनेक दशकांपासून मोहिते-पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या या नेत्यांनी भाजपची वाट धरल्याने माळशिरस विधानसभा आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते-पाटलांना हा मोठा धक्का मानला जात आहे. “विकासकामांना गती देण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला आहे,” अशी भावना प्रवेशकर्त्या नेत्यांनी व्यक्त केली.

​यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “बाबाराजे देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार खंबीरपणे या नेत्यांच्या पाठीशी उभे राहील.”

​या पक्षप्रवेश सोहळ्याला नातेपुते व परिसरातील अनेक कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button