शहर

मधमाशांच्या हल्ल्यात सफाळे विराथन बुद्रुक येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू…

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे पश्चिम येथील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील तलावपाडा गावातील 80 वर्षीय वृद्ध महिला आपली गुरे चारण्यासाठी गेली असताना तिच्यावर मधमाशांनी हल्ला केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

सफाळे पश्चिम भागातील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील तलाव पाडा गावातील सोनुबाई नारायण भोईर वय वर्ष 80 ही वृद्ध महिला मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता शिलटे पाडा गावाजवळ असलेल्या वडाच्या झाडाजवळ गुरे चारण्यासाठी गेली होती. याच वडाच्या झाडाजवळ मुंबई अहमदाबाद कडे जाणाऱ्या बुलेट ट्रेनचे सिमेंट पोल उभारण्यात आले आहेत या पोलला लागलेल्या मधमाश्यांच्या घरट्यातील दीडशे ते दोनशे मधमाशांनी एकाएकी या वृद्ध महिलेच्या तोंडावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ही महिला गंभीरित्या जखमी झाली होती. म्हणून तिला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

परंतु असह्य वेदना व तिच्या संपूर्ण शरीराला सूज आल्यामुळे तसेच तिच्या शरीरात विषाचे प्रमाण वाढल्यामुळे तिचा अखेर बुधवार दिनांक 27 मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button