अकलूज येथे २८ मे रोजी साजरी होणार बकरी ईद; नमाजची वेळ आणि नियोजन जाहीर

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
अकलूज शहरातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. अकलूज शहरात आगामी बकरी ईद (ईद-उल-अजहा) साजरी करण्यासंदर्भात नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते ईदचे नियोजन आणि नमाजची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
या नियोजनानुसार, अकलूज शहरात गुरुवार, दिनांक २८ मे २०२६ रोजी बकरी ईद साजरी केली जाणार आहे. ईदच्या नमाजचे वेळापत्रक खालीलप्रमाणे असेल

नमाज आणि जमातीचे वेळापत्रक:
सकाळी ७:३० वाजता: ईदच्या नमाजसाठी मुख्य जमात काझी मोहल्ला, अकलूज येथून निघेल आणि ईदगाह मैदानाकडे रवाना होईल.
सकाळी ८:१५ वाजता: ईदगाह मैदानावर अजान दिली जाईल.
सकाळी ८:३० वाजता (ंतंतोतंत): ईदगाह मैदानावर बकरी ईदच्या नमाजची जमात (नमाज) सुरू होईल.
या वर्षी ईदच्या नमाजची संपूर्ण जबाबदारी मदिना मशीद (काझी मोहल्ला) यांच्याकडे असून, मदिना मशिदीचे मुख्य इमाम हेच ईदची नमाज पढवणार आहेत.
आवाहन: तरी अकलूज शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेचे काटेकोर पालन करून, सकाळी ठीक ८:३० वाजण्यापूर्वी ईदगाह मैदानावर उपस्थित राहावे, अशी नम्र विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.



