शहर

अकलूजमध्ये ७ जून रोजी रंगणार ‘इज्तेमाई शादी’ सोहळा; बागवान सहारा फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network

अकलूज: समाजातील विवाह सोहळे सुलभ व्हावेत आणि वधू-वर पक्षांवरील वाढता आर्थिक भार कमी व्हावा, या उदात्त हेतूने अकलूजमधील बागवान सहारा फाउंडेशनच्या वतीने वर्ष (२) रे ‘इज्तेमाई शादी’ म्हणजेच सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य निकाह सोहळा रविवार, ७ जून २०२६ रोजी अकलूजमध्ये पार पडणार आहे.

​’आओ निकाह को आसान करे’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात लग्नसमारंभातील अवाढव्य खर्च आणि उधळपट्टीमुळे अनेक सामान्य कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून बागवान सहारा फाउंडेशनने सलग दोन वर्षापासून पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे सामाजिक एकोप्यासोबतच लग्नातील अनावश्यक खर्चाला लगाम बसणार आहे.

​विवाह सोहळ्याचे नियोजन खालीलप्रमाणे:
दिनांक: रविवार, ७ जून २०२६
स्थळ: आनंदी गणेश मंगल कार्यालय, आनंदनगर-अकलूज, ता. माळशिरस.
वेळ: सकाळी (नियोजित वेळेनुसार)

​या सोहळ्यासाठी बागवान सहारा फाउंडेशनने जय्यत तयारी सुरू केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू कुटुंबांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे उपक्रम माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील, अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह (बाबा) मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहारा फाउंडेशनचे अध्यक्ष तोहीद (मुन्ना) चौधरी, उपाध्यक्ष हाजी नाजीर हुसेन मोहोळकर, सचिव तनवीर तांबोळी, सहसचिव आलिम बागवान, खजिनदार नाजिम खान यांच्यासह रफिक तांबोळी, जावेद बागवान, जुबेर बागवान, दिलदार मोहोळकर, साहिल बागवान आणि अखिल बागवान हे सदस्य परिश्रम घेत आहेत.

या सामूहिक विवाहासाठी नाव नोंदणी किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बागवान सहारा फाउंडेशन,​ संपर्क क्रमांक:
तोहीद (मुन्ना) चौधरी अध्यक्ष ९८६०८०६०८१
हाजी नाजीर हुसेन मोहोळकर उपाध्यक्ष ९७३०३९९८८६
तनवीर तांबोळी सचिव ९८९०५६८००४
आलिम बागवान सहसचिव ९९७०१८१७८९
नाजिम खान खजिनदार ९८९०७०२०९५
रफिक तांबोळी सदस्य ९१७५०२७५५५
जावेद बागवान सदस्य ८२६३००९९६६
जुबेर बागवान सदस्य ७७०९०८५१०४
दिलदार मोहोळकर सदस्य ८६००२१०९००
साहिल बागवान सदस्य ९७३०९८०५८६
अखिल बागवान सदस्य ९९२२५२६३४०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button