शहर

54 लाखाचे वीज बिल थकीत…सफाळे करवाळे धरणाचा वीजपुरवठा खंडित… सतरा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे करवाळे धरण 17 गाव पाणी पुरवठा योजनेमधील नल जोडणी धारक व अनेक ग्रामपंचायतींसह सफाळे पाणी कमिटीने 54 लाखाचे थकीत पाण्याचे देयक बिल भरले नसल्या कारणामुळे महावितरण सफाळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी करवाळे धरणाचा वीजपुरवठा गेल्या सहा दिवसापासून खंडित केला आहे.
या कारणामुळे सतरा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

2009 पासून सफाळे करवाळे धरणातून सफाळे भागातील उंबरपाडा -सफाळे, माकणे जलसार,टेंभीखोडावे, मांडे विठ्ठलवाडी, विराथन बुद्रुक अशा 17 ग्रामपंचायतींना या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. परंतु प्रत्यक्षात या सतरागाव पाणीपुरवठा योजनेचा लाभ माकणे, सफाळे -उंबरपाडा, मांडे विठ्ठलवाडी विराथन बुद्रुक, जलसार,टेंभीखाडावे अशा मोजक्या ग्रामपंचायती घेत असून अन्य ग्रामपंचायतीच्या हद्दीत हा पाणीपुरवठा मार्ग बंद आहे.
या योजनेचा लाभ घेत असलेल्या नल जोडणी धारकांसह काही ग्रामपंचायतीने थकीत बिल भरणा न केल्यामुळे सफाळे पाणी कमिटी महावितरणाचे 54 लाखाचे बिल भरण्यास असमर्थ ठरली आहे.

या कारणामुळे या कमिटीला महावितरणाकडून नोटीस देऊन सफाळे करवाळे धरणाचा वीजपुरवठा मंगळवार दिनांक 17 मार्चपासून खंडित करण्यात आला आहे.यामुळे गेल्या सहा दिवसापासून विराथन बुद्रुक,जलसार,चिखलपाडा, टेंभीखोडावे, मांडे, विठ्ठलवाडी, किरईपाडा, तलावपाडा, वैतीपाडा, नांदगडी अशा अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण पाणीटंचाई समस्या निर्माण झाली आहे.

1)⛔ गेल्या अनेक वर्षांच्या थकीत बिलावर व्याजावर चक्री व्याज महावितरणाने लादल्यामुळे अनेक ग्रामपंचायतीने बिल भरणा करून देखील थकीत बिल या नावावर सफाळे करवाळे धरणाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

  • महेंद्र पाटील. सरपंच.
    ग्रुप ग्रामपंचायत मांडे विठ्ठलवाडी.⛔

2)⛔ सफाळे पाणी कमिटीने
महावितरणाचे 54 लाख रुपये थकीत बिल बाकी भरणा न केल्यामुळे या कमिटीला नोटीस देऊन सफाळे करवाळे धरणाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

अनिरुद्ध बैतुल्ये
महावितरण सफाळे उपविभाग कार्यकारी अभियंता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button