मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या सफाळे कर्दल येथील एका इसमाचा रोडखड मोरवणे डॅम्प मध्ये बुडून मृत्यू

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे कर्दल येथील एका (43) वर्षीय इसमाचा रोडखड मोरवणे डॅम्प मध्ये शुक्रवारी दुपारी बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुभाष सुकऱ्या मंडळ वय वर्ष (43) राहणार सफाळे कर्दळ येथील तो रहिवासी होता. शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी त्याला सुट्टी असल्या कारणामुळे तो सफाळे येथील रोडखड येथे असलेल्या मोरवणे डॅम्प मध्ये मच्छी आणि शिंपले पकडण्यासाठी गेला होता. सुभाषला डॅम्प मधील खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा या डॅम्पमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
त्याचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी सर्पमित्र पिंट्या मानकर टीमने आणि सफाळे पोलिसांनी डॅम्पमध्ये शोध मोहीम राबवून पाण्याबाहेर काढून त्याचा मृतदेह शवविच्छेदनेसाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून सफाळे पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.



