क्राईम

सफाळे मांडे मांजुर्ली स्टॉप जवळ 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरून गाडी नेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू.. कारचालक फरार.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे मांजुर्ली स्टॉप जवळ एका 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या अंगावरून अज्ञात इसमाने गाडी नेल्यामुळे तिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान विटी लाईन रस्त्यावरील मांडे मांजुर्ली बसस्टॉप जवळ घडली आहे.
वय वर्ष 70 इंदू आत्माराम ठाकरे असे या वृद्ध महिलेचे नाव असून ती शिलटे पाडा येथे राहत होती.

ही 70 वर्षीय वृद्ध महिला रोज या स्टॉप जवळ बसून रहात होती. बुधवारी दुपारी दोन वाजता ती मांजुर्ली बस स्टॉप जवळ बसली असताना एका अज्ञात भरधाव कार चालकाने तिच्या अंगावरून गाडी नेल्यामुळे तिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर हा कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या घटनेची सफाळे पोलिसांनी पाहणी करून अज्ञात इसमाविरुद्ध सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या अज्ञात कार चालकाचा सफाळे पोलीस कसून शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button