अकलूजचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचा आज वाढदिवस; सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेले पोलीस निरीक्षक नीरज उबाळे साहेब यांचा आज वाढदिवस.आपल्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीने आणि गुन्हेगारीला लगाम घालण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अल्पावधीतच अकलूज शहरासह परिसरात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
नीरज उबाळे साहेबांनी पदभार स्वीकारल्यापासून अकलूज पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. सामान्य नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेणे, गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे आणि पोलीस व जनता यांच्यातील संवाद वाढवणे याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे जनतेतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आज सकाळपासूनच फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उबाळे साहेबांच्या वाढदिवसाचे स्टेटस आणि पोस्ट पाहायला मिळत आहेत. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसानिमित्त बोलताना अनेकांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहर सुरक्षित आणि भयमुक्त राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. उबाळे साहेबांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो, अशी प्रार्थना सर्वच स्तरांतून केली जात आहे.

शिस्तीचा कणा आणि जनतेचा मणा!
अकलूजचे रक्षक, गुन्हेगारांचे भक्षक!
पोलीस दलाचा अभिमान!
अकलूज पोलीस स्टेशनचे कार्यसम्राट पोलीस निरीक्षक,
नीरज उबाळे (साहेब) यांना टाईम्स 9 मराठी न्यूज समुहाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा!



