शहर
कोडोली च्या यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या अभ्यास पूरक प्रकट वाचन स्पर्धेत शीतल चौगुले प्रथम तर मोनाली गायकवाड यांचा द्वितीय क्रमांक

उपसंपादक——-हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मौ.9730 867 448
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयात घेण्यात आलेल्या ‘ अभ्यास पूरक प्रकट वाचन स्पर्धेत शीतल चौगुले या विद्यार्थी – शिक्षिकेने प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
ग्रंथपाल प्रा. डी. डी. पाटील यांनी ग्रंथालयाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अभ्यासक्रमातील पुस्तकेच प्रकट वाचनासाठी निवडण्याची अट घालण्यात आली होती. त्यानिमित्ताने स्पर्धकांचा परीक्षेला हातभार लागणारा अभ्यास होण्यास मदत झाली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :- शीतल चौगुले ( प्रथम), मोनाली गा य क वा ड ( द्वितीय), सीमा चोपडे ( तृतीय), माधुरी पाटील आणि सु स्मि ता इंगवले ( दोघीही उत्तेजनार्थ).



