शहर

तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या बेमुदत संपाला जनशक्तीचा पाठिंबा आणिमहसुल मंञ्याच्या दारासमोर करणार’ डेरा’ आंदोलन

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

दिनांक 3 एप्रिल 2023 पासून सुरू असलेल्या तहसीलदार, नायब तहसीलदार बेमुदत काम बंद आंदोलनाला जनशक्ती संघटनेचा पाठिंबा.

नायब तहसीलदारांनी पुकारलेल्या संपामुळे तहसीलदार कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसला असल्याचे दिसून आले.महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनांनी शासनाकडे ग्रेड पे वाढीसंबंधात पाठपुरावा करण्यात आला; परंतु त्याला यश आले नाही. तसेच बक्षी समितीने दिलेल्या अहवालातही तहसीलदार नायब तहसीलदार या पदाचा ग्रेड पे वाढवून देण्यात आला नाही. नायब तहसीलदार हे महसूल खात्यातील महत्त्वाचे पद असून त्यांच्याकडे अर्धन्यायिक कामकाज, दंडाधिकारी, खनिकर्म, नैसर्गिक आपत्ती मदत व पुनर्वसन, निवडणूक, पर्यवेक्षकीय कामे इत्यादी महत्त्वाची कामे असतात. तरीदेखील या पदाच्या ग्रेड पे मध्ये वाढीसंदर्भात शासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नायब तहसीलदारांनी तीव्र नाराजी बेमुदत संप पुकारला आहे.

शासकीय कार्यालयांकडे विविध कामांसाठी नागरिक धाव घेत आहेत. परंतु या प्रमुख अधिकार्‍यांच्या काम बंद असल्यामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा सरकारी कार्यालयांत पाहायला मिळत आहे

महसूल विभाग हा महाराष्ट्र शासनाचा असणारा विभागाला तील अत्यंत महत्त्वाचा व प्रशासनाचा काना समजला जाणारा विभाग आहे या विभागात समाजातील तळागाळातील शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना पोहोचवण्याचं काम केलं जातं ,सदरील विभागातील शैक्षणिक आपत्ती निवडणूक यासारखे अति तातडीचे व अति जोखमीची कामे पार पाडली जातात ,परंतु तहसीलदारी नायब तहसीलदार यांचे बेमुदत संप असल्यामुळे सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.

जिल्हाधिकारी ते तहसीलदार पातळीच्या विविध दाखल्यांची, प्रमाणपत्रांची कामे, महसूल विभागाचे सर्व पर्यवेक्षकीय कामकाज रखडले. संपाचा परिणाम स्थानिक तालुका पातळीवर होणार आहे. पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजनेसह शेतकऱ्यांच्या संबंधित जमिनीची प्रकरणे नायब तहसीलदार हाताळत असतात यामुळे हि सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच तहसीलदारांकडे असलेल्या महसुली प्रकरणातील सुनावणीसाठी आता पुढील तारखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

त्यामुळे तहसीलदार नायब तहसीलदार यांना ग्रेड पे न लागू केल्यास जनशक्ती संघटनेचे वतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर मधील निवासी यांनी निवेदात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button