अकलूज: कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांना भाजप युवा मोर्चाकडून विनम्र अभिवादन

Times 9 Marathi News Network
अकलूज: सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे खंदे समर्थक आणि थोर समाजसेवक कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, अकलूज शहराच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात अकलूजचे नगरसेवक तथा भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष मा. महेश केशव शिंदे यांच्या हस्ते कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
अभिवादन केल्यानंतर बोलताना महेश शिंदे म्हणाले की, बाबासाहेब माने पाटील यांचे सामाजिक कार्य आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजहितासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती, यामध्ये: उदय कांबळे (अध्यक्ष, युवा मोर्चा),श्रीकांत दोरकर (उपाध्यक्ष),शुभम सूर्यवंशी (सचिव),नवनाथ साठे (कार्यकारिणी सदस्य)यांसह भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



