पालघर जिल्ह्यातील नवापूर ग्रामसेवक राजेश संखे 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उप अधीक्षक दादाराम करांडे यांच्या जाळ्यात अटक

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक : 7030516640
पालघर नवापूर ग्रामसेवकाला 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर अँटीकरप्शन विभागाचे पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे त्यांच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी रंगेहात अटक करून त्यांच्यावर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.(32)वर्षीय तक्रारदार यांना त्यांच्या जागेमध्ये तरंग तलाव कृषी पर्यटनासाठी तीन रूम व त्यामध्ये उपहार न्याहरी सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत नवापूर येथून परवानगी घेणे आवश्यक होते.म्हणून त्यांनी 30 ऑक्टोबर 2025 रोजी एन ओ सी अर्ज दाखल केला होता.
कृषी पर्यटन अनुषंगाने ही एनओसी देण्यासाठी पालघर जिल्हा नवापूर ग्रामसेवक राजेश पंढरीनाथ संखे वय वर्ष (52) यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यावरून तक्रारदार यांनी या ग्रामसेवकाची लेखी तक्रार अँटी करप्शन विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्याकडे केली होती. या तक्रारची पडताळणी करून शिवराज पाटील पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, व भागवत सोनवणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र, सुहास शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन विभाग पालघर पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे , पोलीस निरीक्षक राकेश डांगे, पोलीस हवालदार विलास भोये, पोलीस हवालदार आकाश लोहारे, पोलीस हवालदार जितेंद्र गवळे या पथकाने मंगळवार दिनांक 16 डिसेंबर तर 25 रोजी संध्याकाळी सापळा रचून राजेश संखे यांना तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करून त्यांच्यावर पालघर सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



