पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे आयएसओ नामांकित शाळेत शिक्षकांचा अभाव पालक आणि ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
शिक्षणाचा प्रश्न खरोखरच ऐरणीवर आला आहे. शिक्षणाची गुणवत्ता शिक्षकांची कमतरता अपुऱ्या सुविधा यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण या सारख्या समस्यानी आजचे विद्यार्थी ग्रासले आहेत.अशीच परिस्थिती पालघर जिल्ह्यातील कांद्रेभुरे शाळेची झाली आहे .
पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची आय एस ओ नामांकित असलेली कांद्रेभुरे शाळा या शाळेत कायमस्वरूपी शिक्षकांचा अभाव असल्यामुळे या शाळेत सध्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर तात्पुरते शिक्षक नेमण्यात आल्यामुळे मुलांच्या भविष्याचे काय या विचाराने पालक वर्ग धास्तावले आहेत.
या शाळेत कायम स्वरूपी पूर्ण वेळ शिक्षक न दिल्यास आंदोलन करू असा इशारा या भागातील ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून शिक्षण विभागाला देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यात कांद्रेभुरे या गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे.
या शाळेमध्ये एकूण 42 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळा आयएसओ नामांकित असून देखील सध्या या शाळेमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या शाळेतील 42 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी फक्त दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे शिक्षक देखील कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर आहेत. आणि या शाळेत कायमस्वरूपी शिक्षक येण्यास तयार नाही असे प्रशासनाकडून सांगितले जाते. यामुळे सध्या या शाळेत मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न एरणीवर आला आहे.यामुळे या भागातील पालक वर्गणी आपल्या गावात शाळा असताना देखील आपल्या मुलांना या शाळेतून काढून सात किलोमीटर लांब असलेल्या शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे.
यामुळे आपल्या गावातील शाळा बंद होईल आणि मुलांना शिक्षण घेण्यासाठी गावापासून लांब असलेल्या सात किलोमीटर शाळेपर्यंत जावे लागेल या भीतीने या भागातील पालक वर्ग आणि ग्रामस्थ धास्तावले असून या शाळेत लवकरात लवकर कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा या भागातील पालक आणि ग्रामस्थ आंदोलन फुकातील असा इशारा पालघर शिक्षण विभागाला पत्र देऊन करण्यात आला आहे.



