केळवे जोगाळेनाका ते दसरमाळ पाच कोटी रुपयांच्या रस्त्याची दयनीय अवस्था….. मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा पालघर तालुका अध्यक्षांचा प्रशासनाला इशारा

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक: 7030516640
विजय घरत
केळवे ग्रामपंचायत हद्दीतील जोगाळे नाका ते दसरमाळ या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या संपूर्ण रस्त्यावर खोलवर मोठ-मोठे खड्डे पडून या संपूर्ण रस्त्याची साईट पट्टी देखील दबली गेली आहे.
मे 2024 म्हणजे दीड वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. या रस्त्यासाठी पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून साडेपाच कोटीचा खर्च करण्यात आला आहे.
इतक्या मोठ्या रकमेचा हा रस्ता आणि या रस्त्याला वापरले गेलेले मटेरियल निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. यामुळे वाहतूकदारांना वाहतूक करताना दोन दोन फूट खोलवर खड्डे पडलेल्या रस्त्यावरून तारेवरची कसरत करून राजरोज वाहतूक करावी लागत आहे.

यामुळे या रस्त्यावर अनेक जणांचा अपघात होऊन मृत्यू देखील झाला आहे . अशा या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांनी पाहणी करून हा रस्ता दुरुस्त न केल्यास व संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर वर कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा पालघर तालुका मनसे अध्यक्ष तथा केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी यांनी प्रशासनाला दिला आहे.
येत्या आठ दिवसात सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्ता दुरुस्ती न केल्यास आणि संबंधित ठेकेदार आणि इंजिनियर वर कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन पुकारले जाईल..
पालघर तालुका मनसे अध्यक्ष तथा केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी



