शहर

सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून ‘अकलूज’च्या कर्तव्यनिष्ठ पथकाचा गौरव!

​महत्त्वाच्या गुन्ह्याचा जलद तपास, पोलिस दलाच्या प्रतिमेत भर; पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मान

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

​अकलूज: सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आपल्या कार्यक्षमतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा पुन्हा एकदा परिचय करून दिला आहे. अकलूज पोलीस स्टेशनच्या एका तपास पथकाने एका महत्त्वपूर्ण आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत जलद गतीमध्ये आणि यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल, मंगळवार, ०९ डिसेंबर २०२५ रोजी, त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

​पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या सक्षम नेतृत्वाखालील या पथकात सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार समीर पठाण, अमोल बकाल, आणि रणजित जगताप यांचा समावेश होता. अकलूज पोलीस ठाण्यात गुरनं ७२५/२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १०३(१), ११५(२), ३५२, ३५१ (२), आणि ३८५ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होता.

​या गुन्ह्याच्या तपासात पथकाने उत्कृष्ट तपास कौशल्ये आणि अखंड कर्तव्यनिष्ठा दाखवत, अत्यंत कमी वेळेत सत्य बाहेर काढले.

​या आदर्श तपास कार्याबद्दल सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते संपूर्ण पथकाला प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

​पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आपल्या गौरवास्पद भाषणात कर्मचाऱ्यांच्या कार्याची मनःपूर्वक प्रशंसा केली. ते म्हणाले, “आपल्या सेवेचा महाराष्ट्र पोलीस दलाला अभिमान वाटतो. आपण भावी काळात असेच उत्कृष्टपणे कर्तव्य बजावीत रहाल व महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकाल.”

​या कर्मचाऱ्यांच्या आदर्श तपासामुळे अकलूज पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button