नियमांचे उल्लंघन जड वजनी वाहतुकीमुळे माकणे टेंभीखोडावे मोरिंची दैनिक व्यवस्था

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे विटी लाईन मेन वाहतुकीच्या रस्त्यावरील टेंभीखोडावे आणि माकणे या दोन मोरिंची दैनिक अवस्था झाली आहे.या दोन्ही मोऱ्या जड मालवाहू वजनी गाड्यांच्या राजरोज वाहतुकीमुळे कधीही मोडून पडून या भागातील अनेक गावांचा शहरांपासून संपर्क तुटण्याची दाट शक्यता आहे.याबाबत टेंभीखोडावे आणि जलसार ग्रामपंचायतीने पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील हे अधिकारी या बाबीकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत.
सफाळे विटी लाईन या मेन नऊ किलोमीटरच्या रस्त्यावर एकूण पाच मोऱ्या आहेत. यापैकी माकणे आणि टेंभीखोडावे ग्रामपंचायत हद्दीतील या दोन मोरिंची दयनीय अवस्था झाली आहे.या दोन्ही मोऱ्या सध्या स्थितीत मोडकळीस आल्या आहेत. असे असताना देखील या रस्त्यावरून बुलेट ट्रेन च्या उभारणीसाठी एल अँड टी कंपनी राज- रोज पणे जडवजनी मालवाहू वाहतूक नियमांचे उल्लंघन करून करत असल्यामुळे या दोन्ही मोऱ्या कधीही मोडून पडून या भागातील अनेक गावांचा आणि जलसार जेटी मार्गाचा वापर करून मुंबई अहमदाबाद कडे जाणाऱ्या प्रवाशांचा शहराशी संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.



