शहर

तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील अनोळखी महिलेच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलिसांना यश

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

तलासरी पोलीस ठाणे हद्दीतील एका महिलेचा गळा आवळून खून करून फरार झालेल्या आरोपीला पालघर पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात अटक करून जेरबंद केले आहे.
14 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबई अहमदाबाद हायवे रोड पूर्वेला मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे रोड जवळ पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी अंदाजे 30 ते 35 वयोगटातील स्त्री जातीचे प्रेत सापडले होते.

या गुणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तलासरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अजय गोरड व स्थानिक गुन्हे शाखा पालघर पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांना वेगवेगळी तपास पथके तयार करण्याचे आदेश आणि सूचना दिल्या होत्या या आदेशाचे पालन करून पालघर पोलिसांनी आरोपी बाबत काही एक माहिती नसताना देखील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मयत स्त्री बाबत गोपनीय माहिती काढून तिची ओळख पटवून तिचा पती साकीरअली मुस्तफाअली मंसूरी वय वर्ष (40) राहणार मूळचा उत्तर प्रदेश याला आच्छाड बॉर्डर गुजरात येथून अटक करून त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली पत्नी अफसाना हसरततुल मंसूरी हिचा अनैतिक शारीरिकशारीरिक संबंधाच्या कारणावरून गळा दाबून खून केल्याची पालघर पोलिसांना जबाबी कबुली माहिती दिली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी संजय दराडे-विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र भवन नवी मुंबई,
यतीश देशमुख- पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक, विनायक नरळे- अप्पर पोलीस अधीक्षक पालघर, प्रदीप पाटील- स्थानिक गुन्हे शाखा पालघर, अजय गोरड -पोलीस निरीक्षक तलासरी पोलीस ठाणे, हेमंत देवरे-सहाय्यक पोलीस निरीक्षक, अनिल व्हटकर-सहायक पोलीस निरीक्षक, योगिता गुजर-महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस उपनिरीक्षक-गोरखनाथ राठोड, पोलीस उपनिरीक्षक-रोहित खोत, पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंघे, पोलीस उपनिरीक्षक एन के पाटील,पोलीस उपनिरीक्षक एच एन पाटील, पोलीस उपनिरीक्षक उल्हास पवार, पोलीस उपनिरीक्षक जयंत निकम जयंत, पोलीस उपनिरीक्षक बबन गावित पोलीस उपनिरीक्षक जयराम उमतोल, सहायक फौजदार हिरामण खोटरे, पोलीस शिपाई योगेश मुंडे व सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी पार पडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button