गेल्या 30 वर्षापासून मोहोळ शहराचा एसटी स्टँडचा प्रलंबित असणारा प्रश्न अखेर मार्गी…

🎯 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सह रमेश बारसकर यांच्यावर हि अभिनंदनाचा वर्षाव…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
मागील 30 वर्षापासून मोहोळ शहराचा एसटी स्टँडचा प्रलंबित असणारा प्रश्न अखेर मार्गी लागला असून दिनांक 11/06/2025 रोजी प्रताप सरनाईक साहेब,परिवहन मंत्री,महाराष्ट्र राज्य हे शिवसेना ओबीसी समाज राज्य प्रमुख तथा मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर साहेब यांच्या कार्यालयावर भेट दिली असता रमेश बारसकर साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ शहर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून मोहोळच्या एसटी स्टँड वरून सांगोला,कोल्हापूर,रत्नागिरी,इस्लामपूर,सातारा,आटपाडी,पुणे,मुंबई या ठिकाणहून शेकडो गाड्यांची आवक जावक होत असून BOT तत्त्वावर चांगल्या पद्धतीने एसटी स्टँड करणे कामी निवेदन देण्यात आले होते…
त्या निवेदनाला अखेर यश आल्याने प्रताप सरनाईक साहेब,परिवहन मंत्री,महाराष्ट्र राज्य यांनी मोहोळ एसटी स्टँड साठी BOT तत्वावर जवळ जवळ 3.5 कोटी रूपयाची तत्वता मान्यता मंजूर केल्याबद्दल मोहोळ शहरातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत…
सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर म्हणून हि मोहोळ शहराकडे पाहिले जाते,मोहोळ इथून मंद्रूप मार्गे कर्नाटक येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते आणि हिच बाब लक्षात घेता रमेश बारसकर यांनी या विषयाचा पाठपुरावा करत मोहीम फत्ते केल्याने त्यांच्यावर सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे…



