केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने जलसार येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत .भ्रमणध्वनी क्रमांक- 7030516640
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती व एकता दिनाचे औचित साधून शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीने
पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ यांच्या उपस्थितीत जलसार जेटी ते रोरो मार्ग जेटीपर्यंत RUN FOR UNITY मिनी मॅरेथॉन तीन किलोमीटर परतीच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पालघर जिल्ह्यातील केळवा सागरी पोलीस ठाणे हद्दीतील विद्यार्थी, शिक्षक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील , हॉटेल असोसिएशन सदस्य, पोलीस मित्र ,तरुण वर्ग अशा 600 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रभा राऊळ आणि केळवा सागरी पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.



