‘पैसा नव्हे,’माणूस’ महत्त्वाचा! निमगाव केतकीतून ॲड.सचिन राऊत यांना पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी देण्याची जोरदार मागणी!

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
निमगाव केतकी: राजकारण केवळ पैशावाल्यांचा खेळ बनत चालल्याच्या सर्वत्र चर्चेदरम्यान, समाजासाठी निःस्वार्थपणे झटणाऱ्या कार्यकर्त्याला निवडणुकीत संधी मिळावी, अशी जनभावना निमगाव केतकी परिसरातून समोर येत आहे. येथील तरुण, तडफदार युवा नेते आणि अविरत समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे ॲड. सचिन नारायण राऊत यांना आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी जोरदार मागणी स्थानिक युवकांनी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
जनसामान्यांची भावना: राजकारणात चांगल्या माणसांची संख्या वाढणे आवश्यक आहे. निवडून आल्यावर स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्यांना निवडण्यापेक्षा, कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता सात दिवस चोवीस तास समाजासाठी झगडणाऱ्या आणि तळागाळातील प्रत्येक गरजूच्या मदतीला धावणाऱ्या ॲड. राऊत यांच्यासारख्या व्यक्तींना संधी मिळणे, हाच शेवटच्या घटकाला न्याय देण्याचा मार्ग आहे.
उमेदवारी देताना ‘पैसा’ नव्हे, ‘माणूस’ बघा!
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना केवळ पैशाचा विचार न करता, योग्य आणि चांगली माणसं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे. ॲड. सचिन राऊत यांच्यासारख्या सक्षम आणि निःस्वार्थ कार्यकर्त्याला संधी न मिळाल्याने, ही जनभावना पक्ष नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
ॲड. सचिन राऊत यांच्या कार्याचा मोठा आवाका
’चांगलं काम करायला पदाची गरज नसते’ या विचाराने प्रेरित होऊन ॲड. राऊत यांनी गेल्या वीसहून अधिक वर्षांपासून अविरत सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. त्यांचे कार्य केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित नसून, ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, पर्यावरण आणि आरोग्य अशा सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय आहे.
🌱 पर्यावरण रक्षक: ‘नेचर क्लब’च्या माध्यमातून वर्षभर वन्य प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करतात.
🩺 कोरोना योद्धा व आरोग्यदूत: कोरोना काळात अत्यावस्थ रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले, ज्यामुळे त्यांना ‘आरोग्यदूत’ आणि ‘कोरोना योद्धा’ यांसारखे पुरस्कार मिळाले.
👨🌾 शेतकऱ्यांचे कैवारी: बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केलेली टोमॅटो विक्रीतील शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी सुमारे २०० शेतकऱ्यांना एकत्र करून दलाली व बोली पद्धत बंद केली.
💰 विकास निधीसाठी पाठपुरावा:
जिल्हा परिषद वस्ती शाळेसाठी रु. ५ लाख ई-लर्निंग निधी
भैरवनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी रु. १० लाख निधी
कॅनलवरती लोखंडी ब्रिजसाठी रु. ३ लाख
सहा नंबर वॉर्डातील अनेक विकास कामांमध्ये सक्रिय पाठपुरावा
📚 शैक्षणिक व सामाजिक उपक्रम:
केतकेश्वर विद्यालयात व्याख्यानमाला आणि सार्वजनिक जयंती उत्सवांमध्ये विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या पुस्तकांचे वाटप.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन व प्रशासनाला मदत.
विविध संघटनांना सामाजिक व बौद्धिक मदत.
🛑 भ्रष्टाचाराला आळा: प्रशासनावर मजबूत पकड असल्याने त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले आहेत. निमगाव केतकी येथील ॲम्बुलन्स पळवण्याचा घाट वेळीच आवाज उठवून थांबवला आणि ती ग्रामीण रुग्णालयात परत आणली. कोल्हापूर महापुरासाठी मदतीचा हात दिला.
गेली वीस वर्षे सामाजिक कार्य करत असताना ॲड. राऊत यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यातच ते समाधानी आहेत. त्यामुळे, आगामी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणूक लढवणार की नाही, याबाबत त्यांनी अद्याप मौन धारण केले आहे. मात्र, जनसामान्यांची ही मागणी पक्ष नेतृत्व विचारात घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



