अकलूजच्या ‘वीर साम्राज्य ग्रुप’चा पंधरावा दिवाळी पाडवा रक्तदान महायज्ञ; १०० रक्तदात्यांचा सहभाग

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज: अकलूज येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘वीर साम्राज्य ग्रुप’ने यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या सेवाभावी कार्याची पंधरा वर्षांची परंपरा कायम राखली. यावर्षी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. विनोद मगर आणि डॉ. प्रिया मगर यांच्या डॉ. मगर बाळ रोग तज्ञ हॉस्पिटलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ‘केवळ एकतेतून सेवा, सेवेतून प्रेरणा, रक्तदानातून मानवतेचा सन्मान’ हा उदात्त उद्देश ठेवून हे शिबिर यशस्वी करण्यात आले.
पंधरा वर्षांची समाजसेवेची परंपरा:
गेली पंधरा वर्षे ‘वीर साम्राज्य ग्रुप’ विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे.
- आषाढी वारी: वारकरी भाविकांसाठी अन्नदान आणि मोफत औषधे वाटप.
- पर्यावरण: मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण.
- शिक्षण: गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, तसेच विद्यार्थी दत्तक योजना.
- आरोग्य: कोरोना काळात रुग्णांना मोफत औषधोपचार, महिलांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन.
- आपत्ती मदत: सध्याच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या नागरिकांना कपड्यांचे आणि अन्नधान्यांचे पाकीट वाटप.
समाजासाठी तळमळीने झटणारा ग्रुप म्हणून ‘वीर साम्राज्य ग्रुप’ची सर्वत्र ओळख आहे.

समाजसेवेसोबतच उज्ज्वल करिअर:
या ग्रुपमधील अनेक विद्यार्थ्यांनी समाजसेवेत योगदान देत असतानाच नोकरी आणि शिक्षणातही मोठे यश संपादन केले आहे. यात अभियंता स्वप्नील कुलकर्णी (नगरपालिका), सुनीलकुमार मदभावी (पोलीस), हनुमान काळे (आरोग्य सेवक), डॉ. मगर (पायलट) यांचा समावेश आहे. तसेच, रणजीत कागदे यांनी पीएच.डी. संपादन केली आहे.
समाजसेवेसाठी सदैव धडपडणारा ग्रुप म्हणून ‘वीर साम्राज्य ग्रुप’ने अकलूज परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



