शहर

रमजान ईद संदर्भात अकलूज शहर मुस्लिम समाज व पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क मो. 97 30 867 448

दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी संपूर्ण होणाऱ्या “रमजान ईद “च्या पार्श्वभूमीवर अकलूज शहर मुस्लिम समाजाची बैठक विजय चौक दर्गा मशीद येथे संपन्न झाली या बैठकीसाठी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच अकलूज मधील काझी गल्ली, बागवान गल्ली कब्रस्तान मशीद राऊत नगर मशीद, दर्गा मस्जिद, आदी मशिदीचे पदाधिकारी उपस्थित होते

याप्रसंगी रमजान ईद निमित्त होणाऱ्या नमाज संदर्भात मौलाना जाकिर हुसेन यांनी मार्गदर्शन केले तसेच पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे अकलूज शहर मुस्लिम समाजाला ईद निमित्त सहकार्य राहील अशी आश्वासन देऊन अनुचित प्रकार घडेल असे वक्तव्य कोणीही करू नये

असे आवाहन करुन अकलुज येथील आसलेल्या सामाजिक सलोखा ,एकता भाईचारा बाबत प्रशंसा करुन ईद शांततेत पारपाडावी आसेही आपेक्षा व्यक्त केली.

शिवाय पाऊस पडला तरीही रमजान ईद ची नमाज इदगाह मैदानावरच होईल आणि ईद ची नमाज सकाळी 9/30 वाजता संपन्न होईल असे बैठकीत ठरले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button