वाफगाव किल्ला (खेड ) ते चौंडी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जनजागृती रथयात्रा” चे आयोजन

टाइम्स 9 मराठी न्यूज
दिनांक 24/ 5/ 2023 रोजी चक्रवर्ती महाराजे यशवंतराव होळकर जन्मस्थान वाफगाव किल्ला ( खेड) येथून रथयात्रेचा शुभारंभ होऊन दिनांक 30/5/2023 रोजी रथयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान चौंडी येथे पोहोचणार.
अकलूज दिनांक 27/2/2023 : “राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जनजागृती रथयात्रा” आयोजन संदर्भात WDSO वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन आयोजित ऑनलाइन मीटिंग रविवार दिनांक 26/ 2 /2023 रोजी रात्री संपन्न झाली.राष्ट्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुवर यांच्या अध्यक्षतेखाली आणि वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे ( बारामती) यांच्या उपस्थितीत ही मीटिंग झाली.
दिनांक 24/ 5/ 2023 रोजी चक्रवर्ती महाराजे यशवंतराव होळकर जन्मस्थान वाफगाव किल्ला ( खेड) येथून जनजागृती रथयात्रेचा शुभारंभ होऊन दिनांक 30/5/2023 रोजी रथयात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान चौंडी येथे पोहोचेल. या अनुषंगाने या ऑनलाइन मीटिंगमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
7 दिवसांची ही जनजागृती रथयात्रा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान कार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच प्रत्येक गावातून समाजबांधव 31 मे रोजी चौंडीला यावेत यासाठी वाफगाव (खेड )येथून 24/05/2023 रथयात्रेचा शुभारंभ होईल व 30. 5. 2023 रोजी रथयात्रा चौंडी येथे पोहोचेल. सर्वजण 31 मे रोजी चौंडी येथील कार्यक्रमात सहभागी होतील.
तमाम जगातील जनतेला आवाहन करण्यात येत आहे की ज्यांना जसे जमेल तसे रथयात्रेमध्ये तन, मन ,धनाने आपले योगदान द्यावे. असे WDSO वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन ने “टाइम्स 9 मराठी न्यूज”आणि प्रसिद्धी माध्यमाद्वारे आवाहन केले आहे.
या ऑनलाइन मीटिंगमध्ये शिवाजी गावडे बुवा मुंबई, भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे अकलूज, व्यंकटेश चामनर अंबेजोगाई, सखाराम खोत इंदापूर, पोपटराव पवार इंदापूर, खंडूतात्या तांबडे पुणे, अजय गाढवे पुणे, संभाजी साबळे पुणे, पवन पोटे नागपूर, कांदळकर पुणे, रंजना कोळेकर सांगली, जयश्री टकले पुणे, कैलास गायनर , दादा जाधव नाशिक, पिंटू मुसळे ,संतोष बोरकर नाशिक, शंकर रुपनवर जेजुरी ,दीपक कातुरे पुरंदर,शांताराम भादेकर नाशिक, रामदास मेरगळ पुणे, लोंढे ,सुनील खामगळ अहमदनगर , धनंजय माने श्रीरामपूर, सचिन धायगुडे पालघर,शाहीर खरात यांचे चिरंजीव श्रीगोंदा ,बुलढाणा वरून विश्वास , डॉ. विष्णू माहुरे चंद्रपूर, अधिक पिंगळे सांगली, प्रतीक उरकुडे झरी जामनी , सोनू भिसे कर्जत ,बाळासाहेब भुसारी नेवासा, रणधीर हाके लातूर, वैभव शिंदे पुणे, विलास पाचपोळ जळगाव यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.
वाफगाव (खेड ) ते चौंडी पर्यंत निघणाऱ्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जनजागृती रथयात्रा”चे आयोजनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या विधायक, मौलिक सूचना असतील तर वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष बबनराव आटोळे (बारामती) 9923584072/9284878057 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.



