शिवसेनेचे कोणते आमदार अपात्र होणार? नार्वेकरांकडे सर्वांचे लक्ष

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात येत्या गुरुवारपासून (१४ सप्टेंबर) सुनावणी सुरू होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली असून शिंदे यांच्या पक्षाच्या ४० आमदारांना, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.
आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तिवादही करावा लागेल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर आता याप्रकरणी १४ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाने अलिकडेच विधानसभा अध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीवर तब्बल ६ हजार पानांचे लेखी उत्तर सादर केले होते.



