डहाणू पोलीस ठाणे इन्चार्ज पदी पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची नियुक्ती

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत.
पालघर जिल्ह्यातील डहाणू पोलीस ठाणे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांची बदली कासा पोलीस ठाणे येथे झाली असून डहाणू पोलीस ठाणे इन्चार्ज पदी जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक सुधीर गजानन संखे याआधी जव्हार पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. त्यांची महाराष्ट्र पोलीस खात्यात 1993 रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. 1993 ते 2020 पर्यंत त्यांनी मुंबई पोलीस खतामध्ये आपली दमदार कर्तव्यगिरी बजावली असून 2021 ते 2022 रोजी त्यांची बदली पालघर जिल्ह्यातील वाडा जव्हार येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
2023 रोजी ते जव्हार पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना प्रशासकीय कारणामुळे त्यांची बदली 1 जुलै 2023 रोजी डहाणू पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून त्यांनी 1जुलै 2023 रोजी डहाणू पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर संखे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना महाराष्ट्र प्रदेश सचिव अल्पसंख्यांक मोर्चा मेराज खान, फरदीन खान, जावेद मुजावर, नजीर जामेदार, सदाब खान, हे भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.



