अकलूज येथील इलाही बागवान सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज
सोलापूर शहर बागवान जमियत सिटी ट्रस्ट या संस्थेच्या वतीने समाजातील निवडक आणि विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा नुकताच सोलापूर येथे पार पडला.
सोलापूर शहर बागवान जमीयत सिटी ट्रस्ट चे संचालक हाजी रईसभाई नाफे यांच्या हस्ते अकलूज येथील इलाही बागवान सर यांना “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
“बागवान” ह्या पिढीजात फळविक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणि स्वतः शिक्षणापासून वंचित असलेल्या इस्माईल आणि जैतुनबी या माता पित्यांनी हलाखीच्या परिस्थितीत देखील आपल्या मुलांना उच्चशिक्षण दिले,हे विशेष…
चार भावांच्या कुटूबामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर इलाही बागवान सर यांचे दोन बंधू महेबुबभाई आणि अब्दुलभाई यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले आणि इब्राहिम बागवान सर ह्या बंधूचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे इलाही बागवान सर आवर्जून सांगतात..
इलाही बागवान सर “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर माळशिरस तालुक्याचे “जाणते राजे” जयसिंह मोहिते पाटील (बाळदादा),शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती संग्रामसिंह मोहिते पाटील,स्वरुपाराणी (दिदीसाहेब) मोहिते पाटील युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या सह शिक्षण प्रसारक मंडळांच्या सर्व सहकारी शिक्षक मित्रांनी त्याचबरोबर अकलूज आणि परिसरातील समाजबांधवांनी इलाही बागवान सर यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला…
सदरचा पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील बागवान समाज बांधव आवर्जुन उपस्थित होते…



