माळशिरस पिरळे येथील संदिप वाघ त्यांच्या स्थावर मालमत्तेचा दिनांक 25 9 2025 रोजी दुसऱ्यांदा होणार जाहीर निलाव.

टाईम्स 9 मराठी प्रतिनिधी :महेश मोहिते मो.8380848673
तालुका माळशिरस तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांनी दिनांक 12 3 2025 रोजी पिरळे येथील स्थावर मालमत्तेचा निलाव काढला होता. या यांनी लावाची धास्ती घेऊन संदीप वाघ या कुटुंबाने थोडीफार रक्कम तहसील कार्यालय येथे चेक द्वारे जमा करण्यात आले होती.

तसेच उर्वरित रक्कम जमा करण्यास वाघ यांनी नाकारले असून उपोषण करते श्री रामदास जाधव व सौ अलका जाधव यांनी या उर्वरित रक्कमेसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे धाव घेतली व वरील रक्कम मिळण्यासाठी त्यांनी दिनांक 15 8 2025 रोजी उपोषणाची तयारी केली या उपोषणाद्वारे जिल्हाधिकारी सोलापूर यांनी माननीय तहसीलदार माळशिरस यांना पत्राद्वारे कळविण्यात आले की जाधव कुटुंबाचे वाघ कुटुंबाकडे असलेली काही रक्कम लवकरात लवकर त्यांना अदा करण्यात यावी .

या अनुषंगाने पुन्हा तहसील कार्यालय माळशिरस यांनी दिनांक 25 9 2025 रोजी स्थावर मालमत्तेचा जाहीर निलाव काढण्यात आलेला आहे. तसेच पत्र जाधव यांना देण्यात आलेले आहे . जाहीर निलाव प्रसिद्धीसाठी तहसील कार्यालय यांचे निलावाचे पत्र सोबत जोडत आहे तरी निलावासाठी शासकीय वेळेत हजर राहावे निलाव कोणीही घेऊ शकते



