कोंढेज ग्रामपंचायतचे विकासात्मक धोरण तालुक्याच्या ग्रामीण भागासाठी अनुकरणीय,युवा नेते पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
कोंढेज ग्रामपंचायतीचे विकासात्मक धोरण तालूक्याच्या ग्रामीण भागासाठी अनूकरणीय असल्याचे प्रतिपादन युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी केले. कोंढेज ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोंढेज येथे आज एका चौकास ‘संत श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार चौक’ असे नाव देण्यात आले.तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने येथील श्री भैरवनाथ मंदिरात आर.ओ. वाॅटर फिल्टर (4 लक्ष 50 हजार) बसवण्यात आला,
तर गावांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता (छबीना मार्ग 10 लक्ष) या कामांचे लोकार्पण पृथ्वीराज पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई महापौर केसरी विजेते पै विजय गुटाळ, महाराष्ट्र राज्य मल्लखांब असोशिएशनचे राज्याचे सचीव पांडूरंग वाघमारे सर, पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी कोंढेज ग्रामपंचायत ही नेहमीच विकासाला प्राधान्य देत आली असून गावातील नागरिकांना पायाभुत सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत असते.

ग्रामपंचायतीचा कारभार हा वाखाणण्याजोगा आहे. गावात सर्वांगीण विकास साधत असताना सामाजिक व धार्मिक स्तरावर होणारे काम कौतुकास्पद असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.तर पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी कोंढेज हे गाव देशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळीत झोकुन देऊन काम केले असे गाव आहे.या गावातील स्वातंत्र्य सैनिक स्व एकनाथराव खत्री (जांगडे) तसेच स्वातंत्र्य सैनिक देशभक्त देविदास धोकटे यांचीही नावे गावातील मुख्य चौकांना देण्याची घोषणा केली. तसेच येथील प्रभाग एक मधील वसाहतीस संत रोहीदास नगर असे नाव देण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली.
प्रास्ताविक विठ्ठल-रुक्मीणी सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास महामुनी यांनी केले तर आभार निलेश राऊत यांनी मानले. सूत्रसंचालन निवास सालसकर यांनी केले.यावेळी नूतन सरपंच सौ अश्विनी सव्वाशे यांचा सत्कार विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक वाचनालय सचीव सौ पल्लवी महामुनी यांनी केला तर कार्यक्रमास उपसरपंच शहाजी राऊत,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ छाया राऊत, ग्रा. प सदस्य गोविंद लोंढे, सदस्या सौ दाळूबाई बादल, सदस्या सौ.सारीका आदलिंग, दादासाहेब लोंढे, नागनाथ आदलिंग, नाना आदलिंग, हनुमंत बादल, गणेश सालसकर, आबासाहेब गायकवाड,सतोष माने, सोनीराम महामुनी, रमेश उंबरे, दादा माने, संजय लोंढे, दत्ता आरणे, रामभाऊ सुतार, आदित्य महामुनी, दिपक खत्री, धर्मराज आरणे, रेवननाथ आरणे आदि सह पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



