सफाळे सरावली येथील 40 वर्षीय इसमाचा रेल्वे क्रॉस करताना अपघाती मृत्यू

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
एकापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे स्थानकात रेल्वे अपघाताच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गेल्या आठवड्यात सफाळे जलसार येथील (34) वर्षीय विजय भोईर याचा रेल्वे अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सफाळे पश्चिमेला असलेल्या सरावली गावात राहणारा (40) वर्षीय महेंद्र भोईर याचा रेल्वे अपघात होऊन उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
सफाळे सरावली येथील 40 वर्षीय महेंद्र भोईर हा मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सफाळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना त्याचा रेल्वे रूल ओलांडताना केळवे सफाळे रेल्वे दरम्यान 77/28 किलोमीटरच्या खांब्याजवळ त्याचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे.
या भागात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे ब्रिज उपलब्ध नसल्यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे या घटनेबाबत सफाळे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास रेल्वे लोहमार्ग सफाळे पोलीस करत आहेत.



