महाराष्ट्र
शिवसेना ठाकरे गटाच्या माळशिरस तालुकाप्रमुख पदी मारुतीभाऊ अंबुरे यांच्या निवडीबद्दल सत्कार

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780
अकलूज : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माळशिरस तालुकाप्रमुखपदी मारुतीभाऊ अंबुरे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल बिजवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माळीनगर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संग्राम भोसले, बबन काटकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. मारुती अंबुरे यांनी सोलापूर
जिल्हा जोशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. पूर्वीपासूनच ते कट्टर शिवसैनिक मानले जातात.



