’टाइम्स 9 मराठी’च्या बातमीचा मोठा परिणाम; सोलापूर कारागृह परिसराचा पालटणार चेहरा!

नौशाद मुलाणी संपादक Times 9 Marathi News Network
सोलापूर: सोलापूर जिल्हा कारागृह परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्या-उठण्याची सोय नसणे आणि पसरलेले अस्वच्छतेचे साम्राज्य, या गंभीर समस्येकडे 9 मराठी’ (Times 9 Marathi News) ने बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. या बातमीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, आता कारागृह परिसराच्या स्वच्छतेसह बांधकाम कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

नेमके प्रकरण काय होते?
काही दिवसांपूर्वी ‘टाइम्स 9 मराठी’ने कारागृह परिसरातील विदारक स्थितीचे वास्तव मांडले होते. शहरातील अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सध्या अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले होते. कारागृहाच्या गेटसमोरच कचऱ्याचे ढीग आणि सांडपाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती, प्रशासनाच्या या कारभारावर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता.जिल्हा कारागृहाच्या मुख्य गेटमधून दररोज अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि कैद्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी कायद्यांच्या नातेवाईकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था देखील केलेली नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होता कायद्यांच्या भेटीगाठीसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रतिक्षालय बांधण्यात आलेला असून त्या प्रतीक्षालया मध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट मात्र, याच मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर गेल्या काही दिवसांपासून कचरा साचला होता. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचले होते. येथेच असणाऱ्या शौचालयामध्ये दुर्गंधी सुटलेले होती यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छतेचा संदेश देत आहे, तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांच्या परिसरातच अस्वच्छता पाहायला मिळत होती. कारागृह प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे, कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा परिसर मोकळा आणि स्वच्छ असणे गरजेचे असताना, प्रवेशद्वारासमोरच अस्वच्छता असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत होता.या अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. महापालिका प्रशासन आणि कारागृह प्रशासन या दोघांनीही एकमेकांकडे बोट न दाखवता, तातडीने या परिसरातील कचरा उचलून स्वच्छता करावी, अशी मागणी जोर धरत असल्याची ही बातमी प्रसिद्ध होताच संबंधित विभागाने याची गंभीर दखल घेतली असून कारागृह परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून साचलेला कचरा हटवण्यात आला आहे. तसेच, नागरिकांच्या सुविधेसाठी परिसरात नवीन बांधकाम आणि आसन व्यवस्था करण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात आले आहे.

’टाइम्स 9 मराठी’ने जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळे प्रशासनाला जाग आली आणि हे रखडलेले काम सुरू झाले, अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून ‘टाइम्स 9 मराठी’च्या निर्भीड पत्रकारितेचे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे.



