महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायतीचा आगळावेगळा उपक्रम निर्माल्यापासून बनणार सेंद्रिय खत

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून पालघर जिल्ह्यातील केळवे ग्रामपंचायत आगळावेगळा उपक्रम राबवत आहे .
या उपक्रमाचे नाव निर्माल्यापासून सेंद्रिय खत ( कंपोस्ट खत) असे आहे.गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मूर्ती सोबत केळवे ग्रामपंचायत हद्दीतील केळवे बीच समुद्र चौपाटीवर या भागातील वाहून आलेली फुले पाने हार व पूजेचे साहित्य या सर्व निर्माल्याला एकत्र करून त्याचे विघटन करून
केळवे समुद्रकिनारी मोठा खड्डा करून या खड्ड्यांमध्ये सेंद्रिय खत( कंपोस्ट खत ) तयार केले जाणार आहे.

हा उपक्रम केळवे ग्रामपंचायती मार्फत केळवे बीच समुद्र चौपाटीवर 21 दिवस राबवला जाणार आहे .
या निर्माल्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत केळवे ग्रामपंचायत हद्दीतील केळवे बीच समुद्र चौपाटीवर असलेल्या नारळ आणि फुलझाडे यांच्यासाठी वापर केले जाणार असल्याचे केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी यांनी टाईम्स 9 मराठी न्यूज पालघर जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button