महाराष्ट्र
घाडगे कुटूंबियांचे सांत्वनासाठी श्रीराज दत्तात्रय भरणे यांची भेट

बावडा प्रतिनिधी मोहंमद कैफ तांबोळी,
मोबा – 8378076123
पिंपरी बुद्रुक येथील श्रीमती मथुराबाई जगन्नाथ घाडगे ( आक्का ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानिमित्ताने घाडगे कुटूंबियांचे सांत्वन भेटीसाठी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज दत्तात्रय भरणे आले होते. यावेळी बाळासाहेब घाडगे, सुनिल घाडगे, कैलास घाडगे, सुदर्शन बोडके, संतोष सुतार, प्रशांत गायकवाड आदिंसह कुटुंबिय उपस्थित होते.

तसेच घाडगे कुटूंबियांच्या सांत्वन भेटीसाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तुकाराम महाराज यांचे वंशज बापूसाहेब महाराज देहुकर यांनी भेटून कुटूंबियांच्या दु:खात सहभागी असून देव दुःख पचवण्याची शक्ती देवो अशा सद्भावना व्यक्त केल्या.



