पालघर जिल्ह्यातील दातिवरे हायस्कूल मध्ये सर्पमित्र समवेत नागपंचमी साजरी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील दातिवरे शिक्षण संस्थेच्या दातिवरे इंग्लिश हायस्कूल मध्ये मंगळवार दिनांक 29 जुलै रोजी शालेय संस्कृतिक मंडळा मार्फत श्रावण पंचमी अर्थात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सदर कार्यक्रमाचे नियोजन करीत असताना समाजामध्ये साप व त्यांच्या प्रजाती याबद्दल असणारी श्रद्धा आणी अंधश्रद्धा यातून विध्यार्थी वर्गाला योग्य मार्गदर्शन व्हावे हे उदिष्ट साधून शालेय सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रूपेश राऊत यांनी नवनिर्वाचित मुख्याध्यापक सुजय वसावे यांच्या मार्गदर्शना खाली हा अनोखा उपक्रम घडवून आणला.

सदर कार्यक्रमाला दातिवरे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी सरपंच भारत राऊत,पालघर येथे कार्यरत असणारे लघु उद्योजक व सर्पमित्र सचिन राठोड, रोहित पडियाळ लघु उद्योजक व सर्पमित्र असून ते “सर्प इंडिया” या सापांचे रेस्क्यू मिशन चावणाऱ्या संस्थेत गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत.तसेच त्यांच्या या सर्प इंडिया या संस्थेला 1 जून 2025 रोजी पंधरा वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी 15 हजार वृक्ष लागवड करून अनोखा एक ऐतिहासिक उपक्रम साजरा केला आहे. सचिन राठोड यांनी अतिशय विस्तृत व विपुल माहिती देऊन. नागपंचमी दिनाचे महत्व सांगितले.
सापा तील विषारी साप,निम्न विषारी साप, व बिनविषारी साप अशी वर्गवारीकरत अतिशय मोलाची माहिती सांगितली. सापांचे निसर्गातील स्थान त्याचे महत्व व समाजात सापा बद्दल असणाऱ्या समज, गैरसमज यावर त्यांनी विदयार्थ्यांचे व शिक्षकांच्या अनेक शंकांचे निरसन केले. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी सर्पज्ञान विध्यार्थ्यांन पर्यंत पोहचवले. तसेच शाळेच्या शिक्षिका सौं. मनीषा कुलकर्णी यांनी नागपंचमी निमित्त मुलांना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले.शाळेतील मुलींनी नागपंचमी निमित्त एक सुंदर गीत गायले तर बाजूलाच एक उत्तम ग्रुपडान्स ही या गीतावर सादर करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व विध्यार्थी वर्गाचे उत्तम सहकार्य लाभले. तसेच माजी विध्यार्थी विजय वैद्य यांचे ही उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रूपेश राऊत यांनी केले.



