माळीनगर गावाला ग्रामपंचायत अधिकारी( ग्रामसेवक)पूर्ण वेळ नसल्याने गावचा विकास खुंटला?

प्रतिनिधी… रियाज मुलाणी
मो.9921500780
माळीनगर : माळीनगर हे गाव १५ ते २० हजार लोकसंख्या असलेले गाव तालुक्यामध्ये नेहमीच चर्चेत असणारे हे गाव या गावावरती गेली दहा वर्ष एक हाती सत्ता होती.
गावचा विकास व्हावा गावामध्ये परिवर्तन घडावे,गाव सुजलाम, सुफलाम व्हावे या आशेने गावच्या जनतेने परिवर्तनासाठी परिवर्तन पॅनलच्या गळ्यात विजयाची माळ घातली. परंतु जनतेच्या पदरी घोर निराशाच
निवडणुका होऊन साधारणपणे दीड वर्षे झाली यातील जवळपास एक वर्षाच्या आसपास गावाला ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) पंचायतीचा कारभार चालवण्यासाठी पूर्ण वेळ नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
आठवड्यातून फक्त २ दिवस गावाला अधिकारी आहे त्यामध्ये ही मीटिंग, शासकीय कामे, यामध्ये दोन दिवसामधील एखादा दिवस निघून जातो गावातील जनतेला लागणारी कागदपत्रे ,दाखला , उतारा, यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत, त्यात पंचायतीतील कामगार,कर्मचारी जनतेला उडवा उडीची उत्तरे देतात, कुठलाही नागरिक पंचायतीत गेल्यावर त्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या माहिती दिली जात नाही. जनतेच्या कामाची तात्काळ दखल घेतली जात नाही.ज्या गावाला दोन दिवस अधिकारी (ग्रामसेवक) आहे त्या गावचा विकास खराच होऊ शकतो का? या अधिकाऱ्यांकडे सध्या वेळापूर व माळीनगर अशा दोन गावाचा पदभार आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीने दोन्ही गावे मोठी आहेत. ज्या जनतेने गावाच्या परिवर्तनासाठी ,विकासासाठी तुम्हाला सत्तेत बसवले तो गावाचा विकास व्हावा म्हणून विकास खुंटावा म्हणून नाही.तरी सदर सत्तेत खुर्चीवर बसलेले व झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधारी यांना जाग यावी अन्यथा जनतेलाच न्याय व हकासाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.तूर्तास एवढेच.
माळीनगर गावच्या जनतेचा आवाज सत्याधार्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आमच्या लेखणीतून नेहमीच प्रयत्न करू.



