सफाळे विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील इंग्रज पूर्व काळातील मंदिराकडे तसेच शेतकऱ्यांचा शेतात जाण्याचा वडिलोपार्जित रस्ता केला एका शेतकऱ्याने बंद

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640
सफाळे येथील विराथन बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील इंग्रज पूर्व काळातील वाघोबा मंदिराकडे व शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा वडिलोपार्जित रस्ता एका शेतकऱ्याने बंद केल्यामुळे विराथन बुद्रुक येथील ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून हा रस्ता लवकरात लवकर मोकळा करावा अशी ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात आली आहे.
सफाळे पश्चिम पूर्व भागातील विराथन बुद्रुक येथे इंग्रज पूर्व काळापासून वाघोबा मंदिर आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी व या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी असलेला वडिलोपार्जित रस्ता या गावातील एका शेतकऱ्याने बंद केल्यामुळे या गावात सध्या तणावाचे वातावरण पसरले आहे.
या रस्त्यासह या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या गावठण जागेवर देखील अतिक्रमण करण्यात आल्यामुळे योग्य ती कारवाई करून हा रस्ता मोकळा करून हे अतिक्रमण दूर करण्यात यावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.



