महाराष्ट्र

“अपना”पन जपणारे हाजी फारुखभाई तांबोळी…

विशेष प्रतिनिधी,ताहेर मोहोळकर,अकलूज
7756855695

अकलूज येथील सुप्रसिद्ध अपना पान शाॅप चे ओनर आणि प्रसिध्द “उद्योगपति” फारुखभाई तांबोळी यांनी नुकतीच मुस्लिम धर्मियांची पवित्र अशी हजयात्रा करुन मायदेशी परतले,या वेळी त्यांनी आयोजित केलेल्या “शुक्राना” जेवणासाठी आमंत्रित केलेल्या नातेवाईक,मित्र मंडळी आणि सबंध अकलूज मधील हितचिंतकांनी स्वयंवर मंगल कार्यालय अक्षरशः गजबजून गेले होते…

इस्लाम धर्मात पवित्र हजयात्रेस जाण्याआधी शरीरा बरोबर मन स्वच्छ ठेऊन जाण्याने हजयात्रा सत्कर्मी (कबूल) होते,त्याचाच प्रत्यय आज हाजी फारुख भाई आणि तांबोळी परिवाराला भेटल्यानंतर झाला…

अल्लाह च्या कृपेने “उद्योगपती” होण्याचे भाग्य लाभलेले हाजी फारुकभाई तांबोळी यांना बंधू हाजी बशीरभाई तांबोळी (प्रगतशील शेतकरी) यांची साथ हि तेव्हढीच तोलामोलाची असते हे आपणास वारंवार दिसून येत असतेच…

आपल्या मुलांना म्हणजेच राजूभाई,इम्तियाज भाईंना दिलेले संस्कार हिच मोठी श्रीमंती असल्याचे हाजी बशीरभाई आणि हाजी फारुखभाई आवर्जून सांगतात…

क्या होता है कपट से,
क्या होता है क़िना से,
हाजीयोंसे सवाल रहेगा
क्या लेके आये मदिना से…?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button