नालासोपारा मध्ये सापडले प्लास्टिकच्या गोणीमध्ये जिवंत दीड महिन्याचे स्री जातीचे बेवारस अभ्रक

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
नालासोपारा येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.नालासोपारा पश्चिमेकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ एक स्त्री जातक दीड महिन्याचे बेवारस अभ्रक गुरुवारी पोलिसांच्या हाती सापडले आहे.हे अभ्रक स्त्री जातीचे दीड महिन्याचे आहे.
गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पश्चिमेकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ ही दीड महिन्याची मुलगी एका पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत जिवंत सापडली आहे . अज्ञात इसम या मुलीला जिवंतपणे बेवारस सोडून गेल्यावर या प्लास्टिकच्या गोणीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी या गोणीमध्ये पाहणी केली असता या गोणीमध्ये दीड महिन्याची मुलगी जिवंत असल्याचे दिसून आल्यावर गावकऱ्यांनी याबाबत नालासोपारा पोलिसांना वर्दी दिल्यावर घटनास्थळावरून या मुलीला नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला उपचारासाठी बोळींज येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

या अज्ञात इसमा विरुद्ध नालासोपारा पोलिसांनी गुरुवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत अधिक तपास नालासोपारा पोलीस ठाणे पीएसआय हर्षल राऊत करत आहेत.



