वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर येथे पुन्हा एकदा विरोधकावर साधला निशाणा.

माळीनगर.. प्रतिनिधी… रियाज मुलाणी, टाइम्स 9 मराठी न्यूज मो ..9921500780
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजित पवार, देवेंद्र फडणीस, आदींवर सडकून टीका केली. देशात पुन्हा दंगली होण्याची शक्यता आहे हिंदू-मुस्लिमांत मतभेद झाले तर सरकार पुन्हा येईल असे सत्ताधाऱ्यांना वाटत आहे त्यामुळे गावोगावी हिंदू मुलगी व मुस्लिम मुलगा शोधण्याचे काम सुरू आहे असे ते म्हणाले. भाजपला कर्नाटकातील पराभव पचवणे अवघड झाले आहे एका आदिवासी जमातीला दुसऱ्या आदिवासी जमातीशी लढवण्यात येत आहे.
मणिपूर, राजस्थान, छत्तीसगड, येथे दंगली झाल्या मी औरंगजेबाच्या माजारीवर गेलो नसतो तर इथेही दंगली झाले असते सतत बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही हे चुकीचे आहे शरद पवार हे देशातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नेते आहेत पण आता त्यांच्याकडे काय उरले आहे? अजित पवारांना तिहार तुरुंगात जायचे नव्हते त्यामुळे ते गेले. सरकार कोणाचे येईल हे मी सांगू शकत नाही पण मोदी पंतप्रधान होणार नाहीत हे स्पष्ट आहे देवेंद्र फडणीस यांनाही मतदार हा मालक असल्याचा विसर पडला आहे असेही ते यावेळी म्हणाले.



