सदाशिवनगर चे रण-विजय मित्र मंडळ आले सर्वसामान्यांच्या मदतीला धावून

टाईम्स 9 प्रतिनिधी: महेश मोहिते मो.9307125598
माळशिरस पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मदत केलेली दिसून येत आहे सदाशिवनगर या ठिकाणचे रहिवासी महादेव मिसाळ हे आजारी असल्याने त्यांना तात्काळ रक्ताची गरज भासत असल्याने त्यांनी शेतकरी संघटनेचे दत्ता भाऊ भोसले यांना संपर्क साधला असता लगेच 20 ते 25 रक्तदाते तयार केले असता नातेपुते ब्लड बँक या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी गेलेले प्रवीण दाभाडे ,अशोक कांबळे ,सागर ढगे ,लालासोत्यांनी थोरात ,मंगेश रंधवे ,जावेद मुलानी, नाना जगदाळे ,हे सर्वजण रक्तदान करण्यासाठी गेली होती.
तसेच त्यांनी रक्तदान करून आजारी असलेले पेशंट महादेव मिसाळ यांना रक्त देण्यात आले .तसेच सदाशिवनगर मधील समस्त नागरिकाकडून वरील रक्तदात्यांना खूप शुभेच्छा देऊन त्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले.



