महाराष्ट्र

सदाशिवराव माने विद्यालयात माजी खासदार, सहकार राज्यमंत्री लोकनेते स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील जयंती साजरी.

(अकलूज) प्रतिनिधी- राहुल गायकवाड

येथील सदाशिवराव माने विद्यालय येथे लोकनेते स्व. प्रतापसिंह शंकराराव मोहिते-पाटील यांची जयंती प्रशाला समितीचे सदस्य रणजित माने- देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक अमोल फुले सर, उपमुख्याध्यापक श्री दत्तात्रय घंटे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सुभाष मुंडफणे, संजय जाधव पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाच्या दहावी ब यावर्गाने वर्गशिक्षिका सौ झगडे एस एस यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नेटके नियोजन पार पाडले.

याप्रसंगी विद्यार्थिनी कु. आम्रपाली सूत्रावे हिने मा.खासदार स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सहकार, आर्थिक, क्रीडा, शेती आदी क्षेत्रासह जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वरांजली वाघ व कु. संचिता मोरे यांनी केले. यास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार कु. आयमन बागवान हिने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button