महाराष्ट्र

डहाणू पोलिसांनी 6 महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीच्या अहमदाबाद गुजरात मध्ये जाऊन आवळल्या मुसक्या

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

पालघर जिल्ह्यातील डहाणू पोलीस ठाणे हद्दीतील सहा महिन्यापासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात
डहाणू पोलिसांना यश आले आहे.

अशोक कुमार जसाराम पुरोहित वय वर्ष (20)असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थान राज्यातील असून त्यांनी डहाणू मेन स्टेशन रोड मयूर प्लाझा येथे महादेव मोबाईल अँड वॉच असे विक्रीचे दुकान टाकले होते. या दुकानात त्याने डहाणू, घोलवड,विरार, वसई,भाईंदर येथील ठिकाणचे मोबाईल डिस्ट्रीब्यूटर व सेल्समन यांच्याकडून 33 लाख 5 हजार 448 रुपये किमतीचे मोबाईल हँडसेट स्मार्ट वॉच व सनसुई टीव्ही असे तीस दिवसांच्या क्रेडिट उधारीवर त्याने त्याच्या दुकानात विक्रीकरिता दोन महिन्याच्या मुदतीवर विक्री करता घेऊन सदर सर्वमाल ग्राहकांना
विकून त्याने वरील डिस्ट्रीब्यूटर व सेल्समन यांना त्यांचे देणे असलेले 33 लाख 5 हजार 448 रुपये न देता त्यांच्या विश्वासघात व फसवणूक करून दुकान बंद करून तो गेल्या सहा महिन्यापासून फरार झाला होता.

या आरोपीचा तपास डहाणू पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक अमोल धोडी व पोलीस अंमलदार संकेत गाडीलकर यांनी सतत सहा महिने पाठपुरावा करून आपला मोबाईल बंद करून लपून बसलेल्या आरोपीला अहमदाबाद राज्य गुजरात येथून गुरुवार दिनांक 12 जून 2025 रोजी अटक केले आहे .

ही यशस्वी कौतुकास्पद कामगिरी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू अंकिता कणसे, डॉक्टर भागीरथी पवार परी. पोलीस उपअधीक्षक डहाणू पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली डहाणू पोलिसांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button