शहर

सुरवड येथील दफनभुमीवर अतिक्रमण, प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामसेवकांवर सेवा शिस्त भंगाची कार्यवाही होणार का?

इंदापूर, प्रतिनिधी एस. बी. तांबोळी

सुरवड ( ता.इंदापूर ) येथील मुस्लिम दफनभुमीवर धनदांडगे, श्रीमंत नोकरदार यांनी अतिक्रमण करत घरे बांधली आहेत. सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी वरीष्ठांचे आदेश होवूनही ग्रामपंचायत चालढकल करत त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यासाठी सरपंच व ग्रामसेवकासह चालढकल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वजीर मुबारक मनेरी व मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे.

सुरवड ग्रामपंचायतच्या गायरान गट नंबर ३०५ मधिल २० गुंठे क्षेत्र मुस्लिम दफनभुमीसाठी देण्याचा आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला आहे. ग्रामविकास विभागाच्या सन १९८८ तरतुदीनुसार पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २२ अन्वये दफनभुमी जागा मंजूर करण्याचा अधिकार प्रांताधिकारी यांना असल्यामुळे त्यांनी २० गुंठे जागा मंजूर केलेली आहे.
सुरवड येथील सदर जागेमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून दफनविधी करण्यात येत आहेत. त्यामध्ये जुन्या ५ ते ७ कबरीसह २५ ते ३० कबरी आहेत. परंतु दफनभुमी लगत अतिक्रमण करून कच्च्या विटांचे बांधकाम तीन फुटांपर्यंत करण्यात आले आहे. सदर अतिक्रमणाबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) पुणे, गटविकास अधिकारी इंदापूर यांनी लेखी सुचना करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

तसेच गटविकास अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत सरपंच व ग्रामसेवक यांनी १० जानेवारी २०२३ पर्यंत सदर अतिक्रमण काढून हद्दी निश्चित करून देण्याचे म्हणण्यात मान्य केले. परंतू त्यानंतर त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ प्रमाणे ग्रामसेवक यांचेवर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त नियम १९६४ प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांनी देवूनही अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली नाही.

गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना विचारले असता त्यांनी सांगितले यासंदर्भात कडक व अंतिम निर्णय घेतला जाईल. तसेच ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ प्रमाणे ग्रामसेवक यांचेवर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त नियम १९६४ प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई तातडीने करण्यात येईल. यामध्ये कोणतीही हयगय केली जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button