हिंदू मुस्लिम समाजातील एकोपा टिकून ठेवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केले जामा मशीद मधून शिवजयंती मिरवणुकीचे भव्य स्वागत

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
हिंदू – मुस्लिम समाजातील ऐक्य व एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या हयातीत समाजकार्याच्या माध्यमातून अविरतपणे आपले कार्य करणारे पैगबरवासी कासम सय्यद (सय्यद भाई पत्रकार ) यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचें सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी करमाळा जामा मस्जिद चे अध्यक्षीय विश्वस्त जमीर भाई सय्यद यांच्या पुढाकाराने व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आलेली भव्य दिव्य अशी मिरवणूकचे स्वागत जामा मस्जिद फुल सौंदर्य चौक येथे करमाळा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब , शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी श्री पै सुनील सावंत, सचिन काळे, प्रशांत ढाळे, विजुभाऊ लावंड, नानासाहेब मोरे , जामा मस्जिद चे विश्वस्त हाजी उस्मान सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे उपाध्यक्ष जहाँगीर बेग, सचिव पिंटु शेठ बेग, उद्योजक इंदाज वस्ताद , उद्योजक कय्युम शेठ पठाण, साहिल पठाण, अस्लम नालबंद व मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त आलेली मिरवणुकीचे स्वागत केल्याबद्दल करमाळा पोलीस स्टेशन चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्योतीराम गुंजवटे साहेब यांनी समाधान व्यक्त केले आहे असे उपक्रम राबविले गेले तर पोलीस विभागावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे व सर्व समाजातील सण उत्सव आनंदमयी व हर्ष उल्लास पद्धतीने पार पडतील. अशा पद्धतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल ज्योतीराम गुंजवटे साहेब व शिवजयंती उत्सव समितीने करमाळा जामा मस्जिद व भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम शेवटी पिंटु शेठ बेग यांनी सर्व शिवप्रेमी व पोलीस प्रशासनाचे मिरवणूक शांततेत पार पडल्या बद्दल आभार व्यक्त केले आहे.



