महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने अकलूज प्रांत अधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष माढा विभाग विजय भाऊ कोकणे यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

त्यांच्या मागण्या÷ धनगर हा समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहे परंतु धनगड आणि धनगर या शब्दांमध्ये महाराष्ट्र सरकारने दुरुस्ती करून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण जाहीर करावे व त्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करावी धनगर समाजाला न्याय देऊन प्रश्न मार्गी लावावे.

तसेच मराठा समाज गेल्या कित्येक वर्षापासून आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहे संविधानिक मार्गाने शांततेच्या मार्गाने राज्यांमध्ये मराठा समाजाने 58 मोर्चे काढले व मराठा समाजातील 59 तरुणांनी आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली तरीही मराठा समाजाला आरक्षण राज्य सरकार जाहीर करत नाही ते राज्य सरकारने त्वरित जाहीर करावे व गरीब मराठा समाजाला न्याय देऊन प्रश्न मार्गी लावावे.

महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही कित्येक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही त्याचाच भाग सोलापूर जिल्हा शेतीला उपयुक्त असा पाऊस पडला नसून शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे व्यापाऱ्यांचे व या सर्वांवर अवलंबून असणाऱ्या सर्वच नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत तसेच गुरांना लागणारा चारा शेळ्या मेंढ्यांना लागणारा चारा मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने राज्य सरकारने जिल्ह्यामध्ये चारा छावणी व काही गावांमध्ये पाण्याचे टँकर चालू करावेत व सोलापूर जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांचे पत्र अकलूज चे प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांनी स्वीकारले व एक दिवसीय धरणे आंदोलन स्थगिती ६.०० वाजता करण्यात आले.

या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर तसेच महासचिव विशाल जी नवगिरे महादेव कायदेशीर सल्लागार सुमित सावंत साहेब,पांडुरंग केंगार जिल्हा उपाध्यक्ष साबळे. माढा तालुका अध्यक्ष विनोद. माढा तालुका उपाध्यक्ष प्रदीप भाई सोनटक्के. कुर्डूवाडी शहराध्यक्ष राजू वाघमारे. जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बिरुदेव साळवे. शांतीलाल साळवे. राजू गायकवाड. संतोष बनसोडे. सिद्धांत गवळी. यश मुजावले. शिवाजी मोरे पाटील. योगेश गायकवाड. प्रदीप सरवदे तालुका उपाध्यक्ष.तसेच आर जे आप्पा रुपनवर मा. आमदार (माळशिरस),
२)सेंट्रल ह्युमन राईट संघटना नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष कुमारजी लोंढे उद्योजक भैया बाबर,
३)गणेश इंगळे युवा सेना जिल्हाध्यक्ष ठाकरे गट, गणेश बिदाले ,संतोष साळुंखे,
४)संजय दिनकर मगर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) ,
५)HACE welfare foundation welfare विलशाद गायकवाड सोलापूर जिल्हा अध्यक्ष
पत्रकार मकरंद साठे बंडू कांबळे शिवाजी मोरे पाटील,
६)आयुष्यमान भारत डॉक्टर विश्वास वाघमारे, या सर्वांनी एकदिवसीय उपोषणाला पाठींबा दर्शवला. तसेच यावेळी
सतीश शिंदे. माजी सरपंच उदयनगर राहुल भोसले वाघोली , सतीश शिंदे ,भय्या गाडे ,प्रशांत गाडे, राजू शिंदे, प्रदीप थोरात किरण कांबळे समाधान कांबळे अविनाश पवार, रोहित कांबळे रणजीत नवगिरे प्रेम बनसोडे अभय वाघमारे ,विशाल गाडी अशोक भोसले, सतीश शिंदे अविनाश पवार अनिकेत निचळ, अण्णा निचळ, प्रशांत गाडे, राज काकडे , दीपक देवकुळे आदित्य निचळ अमीर मुलांनी सनी खवळे सुरज असूरे, आदी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button