शहर

अल्लाह ची कृपा अन् आपल्या मेहनतीवर अपार श्रद्धा असलेले अकलूजचे “राम लखन” म्हणजे तय्यूम भैय्या आणि अक्रम बागवान…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज अकलूज
9890299499

योग जुळून येणे आणि योग जुळून आणणे काय असते हे काल मला कळले,काल “बकरी ईद” चा दिवस,त्यात अक्रम चा वाढदिवस आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तय्यूम आणि अक्रम या बंधूंनी स्वकष्टातून बांधलेल्या वास्तूच्या इबतेदायीचा क्षण…

अकलूज येथील महादेव नगर मध्ये तय्यूम (भैय्या) आणि अक्रम या बंधूंनी निचे दुकान आणि उपर मकान असे प्रशस्त बांधकाम पुर्ण केले,काल बकरी ईदच्या निमित्ताने तसेच अक्रम चा वाढ दिवसाचे औचित्य साधत त्या दोघा बंधूंनी नव्या वास्तूला भेट देण्याचे आमंत्रण दिले असल्याने माझा हि तिथे जायचा “योग” जुळून आला…

तय्यूम (भैय्या) आणि अक्रम हे पूर्वाश्रमी चे बटाट्याचे व्यापारी रहीम कासिम बागवान म्हणजेच बाळू कासिम यांची मुले,अगदी लहान वयातच बापाचे छत्र हरवलेल्या दोन मुले आणि दोन मुलींचा सांभाळ आई असणाऱ्या “जमेला” याने अगदी नेटानेच केला,दोन्हीं मुलींचा विवाह झाल्यानंतर “जमेला” हि पैगंबर वासी झाली…

तय्यूम (भैय्या) आणि अक्रम यांच्यावरून पितृ छतानंतर आता मातृ छत्र देखील हरपले होते,अशा वेळी दोघा बंधूंना मार्गदर्शन मिळाले ते मामा असणारे रफीकभाई,करीमभाई,बशीरभाई, अखतरभाई आणि बाळू लतीब यांचे…

बागवान धंद्यातील बारकावे आत्मसात केल्या नंतर तय्यूम (भैय्या) आणि अक्रम या दोघां बंधूंनी अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वतंत्र अशा “ताज” फ्रुट मर्चंट या नावाने फर्म सुरू केली,अन् येथून पुढील काळात देखील “संघर्ष” हा यांच्या पाचवीला पुजलेला असताना देखील आपले कर्तृत्व या दोघा बंधूंनी वेळोवेळी सिद्ध केले…

दरम्यानच्या काळात हुसेन बावीकर,अखतर मामा,स्व महामुद कासिम,नाझीम खान आणि एजाज बागवान तसेच सोलापूर येथील दाजी अन कर्जत येथील दाजी यांनी जे सहकार्य या दोघा बंधूंना केले ते अगदी न विसरण्यासारखे,काल जेंव्हा “दावत” साठी महादेव नगर,येथे जाणे झाले त्या वेळीच माझा देखील ऊर भरून आला होता,खरंच तय्यूम (भैय्या) आणि अक्रम यांनी “करून दाखवलं” हेच शब्द मनातून बाहेर पडले…

आजच्या घडीला तय्यूम (भैय्या) आणि अक्रम हे दोघेही आपापल्या संसाराचा गाडा सुरळीत पणे हाकत असुन काल “बकरी ईद” आणि अक्रम च्या वाढ दिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेला नव गृह प्रवेश त्यांच्या कर्तृत्वावर शिक्का मोर्तब करतो,हे मात्र तितकेच खरे…

तय्यूम (भैय्या) आणि अक्रम यास पुढील दैदिप्यमान कारकिर्दिस माझ्या सदैव शुभेच्छा असतील…
🌹🌹🌹💐🌹🌹🌹

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button