फिल्मी स्टाईल अशोक धोंडी हत्या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश धोंडी पालघर पोलिसांच्या जाळ्यात अटक…. तर पोलीस अधिकारी धांगडा निलंबित पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची कारवाई

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640
पालघर जिल्ह्यातील अशोक धोंडी फिल्मी स्टाईल हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार आरोपीला 5 महिन्यानंतर अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून अन्य 3 आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत तर या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या जबाबदार पोलीस अधिकारी धांगडा यांना निलंबित करून अन्य 8 पोलिसांच्या विरुद्ध कारवाई करून घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक यांची बदली पालघर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी केली आहे.
डहाणू येथील अविनाश धोंडी यांनी त्यांचा भाऊ अशोक धोंडी यांची जमिनीच्या वादातून 19 जानेवारी 2025 रोजी अपहरण करून हत्या केली होती. व त्यांचा मृतदेह गुजरात येथील एका बंद दगडी खदानी मधील चाळीस फूट खोल पाण्यात एका गाडीच्या डिकीमध्ये बंद करून फेकून दिला होता. हा मुतदेह कुजलेल्या अवस्थेत 15 दिवसानंतर पालघर पोलिसांच्या हाती सापडला होता.
यानंतर चौकशी दरम्यान या प्रकरणातील आरोपी पोलीस ठाण्यातून फरार झाले होते.
यापैकी एक मुख्य आरोपी हत्तेचा सूत्रधार अविनाश धोंडी यांना पालघर पोलिसांनी 5 महिन्यानंतर रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी दुपारी सिलवासा गुजरात बॉर्डर वरून अटक करून पालघर कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर या प्रकरणातील अन्य 3 आरोपी सुनील धोंडी राहणार डहाणू, मनोज राजपूत आणि आशिष धोंडी राहणार वलसाड यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
ही कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पालघर सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल सावंत, गोपीनाथ राठोड,रोहित खोत, राजेश वाघ, स्वप्निल नलावडे, पोलीस हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, कैलास पाटील,दिनेश गायकवाड,भगवान आव्हाड, संजय धांगडा, विशाल डोंगरे या पथकाने केली आहे.



